फोन व बोलताना आवाज कट होणं किवा कॉल ड्रॉप होतोय. मग हे वापरून पहा कधीच आवाज कट किंवा कॉल ड्रॉप होणार नाही.


कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन आहे. लोक घरात असल्यानं त्यांचा बराचसा वेळ स्मार्टफोनवर जातो. यातच मित्र, नातेवाईक, ऑफिसमधले सहकारी यांच्याशी बोलण्यासाठी जास्त वापर होतो. यामुळे व्हॉइस कॉलिंगचे प्रमाण वाढले आहे. यातही आवाज न येण्याची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे. आवाज कट होणं किवा कॉल ड्रॉपचे प्रकार घडत आहेत.
          तुम्हालाही कॉलवर आवाज येत नसेल किंवा कॉल ड्रॉप होत असेल तर मोबाइलच्या एका फीचरचा फायदा होऊ शकतो. वायफाय कॉलिंग फीचर तुम्ही ट्राय करू शकता. वाय फाय कॉलिंगचे अनेक फायदे आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय स्पष्ट आवाज ऐकू शकता. यामध्ये सध्याचा मोबाइलनंबर आणि स्मार्टफोन यांचाच वापर करते. त्याला कोणत्याही अ‍ॅपची गरज नाही. कमी नेटवर्क असेल त्याठिकाणीही वाय फाय कॉलिंगचं फीचर उपयोगी पडतं. हे एक असं तत्रज्ञान आहे जे कॉल रिसिव्ह कऱण्यासाठी आणि डाय करण्यासाठी तुमच्या वाय फाय कनेक्शनचा वापर करतं. इथं कॉल तुमच्या फोनवरूनच जातो पण वापर वायफायचा होतो यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्कही द्यावं लागत नाही.
तुमच्याकडे हव्यात या गोष्टीची आवश्यकता आहे. त्यामध्ये एअरटेल किंवा रिलायन्स जिओचं अ‍ॅक्टिव्ह सिम, वाय फाय कॉलिंग सपोर्ट असलेला स्मार्टफोन, वायफाय नेटवर्क कनेक्ट असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कॉलिंगसाठी महत्वाचा म्हणजे तुमच्या मोबाइलवर बॅलन्स हवा. तुमचे सिम 4जी आणि VoLTEऑन असल्याची खात्री करा.
       वाय फाय कॉलिंग फीचर वापरण्यासाठी  Settings मध्ये  Connections पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Wifi calling पर्याय निवडून टॉगल टर्न ऑन करा.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget