श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम रू.1 कोटी मदत

पंढरपूर : कोरोना व्हायरस (कोविड-19) चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढला आहे. हा व्हायरस तीव्र
संसर्गजन्य स्वरूपाचा असलेने महाराट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे
तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याने, भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दि.17/03/2020 ते दि.31/03/2020 या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. दि.04/04/2020 रोजी चैत्री यात्रा भरत असून, या यात्रेला अंदाजे 3 ते 4 लाख भाविक महाराट्र व इतर राज्यातून येतात. केंद्र शासनाने दि.14/04/2020 पर्यत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केला आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवास करण्यास मा. राज्य शासनाने बंदी घातली आहे, अशा पार्श्वभ्ाूमीवर एवढया मोठया प्रमाणावर पंढरपूरात भाविक आले तर, कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून मंदिर समितीने दि. 04/04/2020 रोजी होणारी चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या कालावधीत श्रींचे सर्व नित्योपचार परंपरेनुसार सुरू राहतील त्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे परंपरंनेनुसार येणार्‍या सर्व दिंडया व सर्व पायी येणार्‍या वारकरी भाविकांनी यात्रा रद्द झाली असल्याने व दि.14/04/2020 पर्यंत श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंदचा निर्णय घेण्यात आल्याने कृपया कोणीही श्रीक्षेत्र पंढरपूरला येऊ नये. असे नम्र आवाहन श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने करण्यात येत आहे.
       तसेच कोरोना व्हायरस (कोविड-19) चा वाढता प्रभाव लक्षात घेता, मा.राज्य शासनाकडून
नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा
परिस्थितीत मानवतावादी भ्ाूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास
मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे व पंढरपूर शहर-परिसरातील बेघर व निराधार नागरिकांसाठी फुड पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच मा.राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाची गरज आहे, ही बाब विचारात घेवून श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला रक्कम रू.1.00/- कोटी मदत देण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे सदरचे पत्रक श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरचे मा.सदस्य सर्वश्री आ. सुजितसिंह ठाकूर,आ.रामचंद्र कदम, श्री.संभाजी शिंदे, श्रीमती.शकुंतला नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, श्री.भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), अ‍ॅड.माधवी निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, श्री.भागवतभ्ाुाण अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, सौ.साधना भोसले यांचेशी विचारविनियम करून एकमताने निर्णय घेतल्यानंतर मा.सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी
अधिकारी श्री.विठ्ठल जोशी यांनी प्रसिध्दीस दिले आहे
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget