दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा.- रोहीत पवार

मुंबई: करोना विरुद्धच्या लढाईत सामूहिक शक्तीचं दर्शन घडवण्यासाठी दिवे व मेणबत्ती जाळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार व शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी स्वागत केलं आहे. 'देशाला करोनाविरोधात एकत्र आणण्याचा मोदींचा हेतू असावा,' असं रोहित यांनी म्हटलं आहे. 
         करोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी देशातील जनतेला संबोधित केले. 'करोनाच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी फक्त ९ मिनिटे द्या. येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे. 
    मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. मोदींच्या आवाहनाचं स्वागत केलंय. 'दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं. अशाच प्रकारे प्रत्येकानं स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करावा, असं आवाहनही पवार यांनी केलंय.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget