Pandharisatyata : Latest News From Solapur and All Over Maharashtra

Girl in a jacket
Latest Post

 सोलापूरात आज नव्याने 50 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 50 रुग्णांमध्ये 34 पुरुष व 16 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 50 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 435 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

आज एकूण 319 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 50 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 269 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील दुकाने उघडण्याबाबत आज निर्णय झाला  आहे. शहरातील सर्व दुकानाची A B C D नुसार शहरातील दुकाने उघडण्यात येणार आहेत. A B C D  नुसार दुकानास वार नेमुन दिलेले आहेत. फक्त ज्या दुकानावर A B C D  नाही. त्याबाबत अजुन खुलासा झाला नाही. 


सोलापूरातील कोरोनाबाधितांची संख्या आता  385  इतकी झाली आहे.आज रविवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एकूण नवीन 21 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.  यात 9 महिला आणि  12 पुरुष यांचा समावेश आहे. तर आत्तापर्यंत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज दोघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

सोलापुरातील कोरोनाबाधिताची संख्या  385  वर पोहोचली आहे.

 
छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र चे अध्यक्ष शिवश्री.समाधान दादा सुरवसे यांच्या सुचनेवरून .प्रदेश उपाध्यक्ष संदिप नवघणे महिला राज्य सचिव सौ.अश्विनी भापकर पुणे शहर महीला अध्यक्ष साधना साळेकर पाटील  यांच्या मार्गदर्शन खाली 
सौ.शिल्पाताई अमर जायगुडे यांची पश्चिम महाराष्ट्र युवा आघाडी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली
          यावेळी संघटनेचे नुतन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना   व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संघटनेची उद्दिष्ट्ये सांगुन त्यांना समाजसेवेचा वारसा दिला. गाव तेथे शाखा । शाखा तेथे समाजसेवा करू व जनतेच्या हितासाठी व जणकल्याणासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे नियोजन समस्त छावा क्षात्रवीर सेना महाराष्ट्र राज्य यांनी केले.

पंढरपूर : गोरगरीब जनतेमध्ये लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर आर्थिक सुलभता आणणेसाठी ललॉकडाऊन ४ जाहीर करताना सोलापूर जिल्ह्यात ज्या भागात कोरोना प्रा्दभाव मागील ५०-५५ दिवसापासून आढळून आला नाही अशा भागामध्ये शासनस्तरावर नियोजन करताना शिथीलता देवून १८ मे पासून किमान सकाळी १० ते ५ पर्यंत सर्वच प्रकारचे उद्योगधंदे सोशल डिस्टन्सचा वापर करून सुरू करणेसाठी
परवानगी देणेबाबतची मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी पंतप्रधान महोदय व मुख्यमंत्री मा.नामदार श्री.उध्दबजी ठाकरेसाहेब यांचेकडे केली आहे.

केंद्र ब राज्य शासनाने कोरोना प्रार्दुभाव रोखणेसाठी जाहीर केलेले लॉकडाऊन ३ दि.१७/५/२०२० रोजी संपत आहे. आत्ताचे परिस्थितीनुसार त्लॉकडाऊन ४ जाहीर करणेबाबत शासनाने यापुर्वीच सुचित केले आहे. प्रामुख्याने मोठ्या शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव दिसून येतो, परंतु ग्रामीण भागात याचा प्रार्दभाव बहुतांशी दिसून येत नाही.

सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव आहे, परंतु सोलापूर ग्रामीण भागात लॉकडाऊन जाहीर झालेपासून ५०-५५ दिवस अतिशय कडकपणे नियमांची अंमलबजावणी जनतेने प्रामाणिकपणे केली असल्यामुळे हा भाग कोरोना मुक्त आहे. या पार्श्वभूमीवर
लॉकडाऊन ४ जाहीर करताना या ग्रामीण भागातील उद्योगधंदे सोशल डिस्टन्सचा बापर करून सुरू करणेचे नियोजन करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील दुकाने किमान दिवासातून ६ ते ८ तास नियमीत उघडावेत, जेणेकरून दैनंदिन कामकाज करून हातावर पोट आहेत असे सर्वसामान्य मजूर, दुकान कामगार, हातगाडेवाले अशा लोकांना आर्थिक अडचणींना तोंड देता येईल. अशा प्रकारची ग्रामीण भागातील जनतेतर्फे मागणी आ.प्रशांत परिचारक यांनी पंतप्रधान महोदय व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.नामदार श्री.उध्दबजी ठाकरेसाहेब यांचेकडे केली आहे.
     किमान ग्रामीण भागात उद्योगधंदे सुरू झाल्यास तेथील जनतेला आर्थिक स्थैर्य मिळण्यास सुरूवात होईल.

सोलापूर : आज  सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी 31 बाधित रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे त्यामध्ये पंधरा पुरुष तर 16 महिलांचा समावेश होतो.
आज एकूण 129 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले त्यापैकी निगेटिव्ह अहवाल 98 आहेत तर पॉझिटिव अहवाल हे 31 आहेत.
कोरोना बाधितांची संख्या आज 31  ने वाढून  308 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  दिली.

सोलापुरात आज नव्याने दोन रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले असून त्या दोन महिला आहेत एक आसरा सोसायटी होडगी रोड येथील महिला असून दुसरी महिला ही शिक्षक सोसायटी सोलापूर येथील रहिवासी. आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे.

आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांमध्ये 158 पुरुष तर महिला 19 आहेत एकूण रुग्णसंख्या 277 झाले आहे तर आजपर्यंत 19 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत ज्यामध्ये दहा महिला असून नऊ पुरुष आहेत आज मयत झालेली महिला ही 52 वर्षाची असून त्या रविवार पेठ परिसरातील होत्या तर दुसरी व्यक्ती शिवाजीनगर मोदी परीसरातील 71 वर्षाचे पुरुष होते अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget