या अँप च्या फिचरद्वारे आपण घरबसल्या स्वतःची कोरोना चाचणी करू शकतो. वाचा कस....

टेक :  कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारकडून आरोग्य सेतू नावाचं अँप लॉन्च केलं आहे. कोरोना व्हायरसची जोखीम कितपत आहे याबाबत आकलन करणारं हे अँप नॅशनल इंफोममेटिक्स सेंटरकडून लॉन्च केलं आहे. या अँपमुळे कोविड-19 संक्रमणाबाबत आकलन करणे आणि गरज वाटल्यास लोकांना सेल्फ आयसोलेशनबाबत सूचना देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना मदत होईल, हे अँप गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड केलं जाऊ शकतं.
       हे अँप तुम्हाला कोरोनापासून वाचण्यासाठी मदत करणार आहे. कोरोनाबधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर तुम्हाला अलर्ट करण्याचं काम या अपद्वारे केलं जाणार आहे. हे अँप युझरच्या फोनचे ब्लुटूथ, लोकेशन आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून तो व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात तर आला नाही ना? या गोष्टी ट्रेस करतं.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता 'डिजिटल प्लॅटफॉर्म', संशयित व्यक्तींचं होणार जिओ मॅपिंग
        कोरोना व्हायरस विरोधातील या लढाईत जगभरात वेगवेगळे शोध लावले जात आहेत. देशात देखील केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोनाविरोधात पूर्णपणे उतरले आहेत. COVID-19 ला ट्रॅक करण्यासाठी वेगवेगळे अँप विकसित केले जात आहेत. नुकतेच केंद्र सरकारने कोरोना कवच नावाचं अँप लॉन्च केलं होतं. आता आरोग्य सेतू नावाचं अप सरकारने लॉन्च केलं आहे. हे अँप कोरोना ट्रेकर अँप आहे. या माध्यमातून आपण घरबसल्या आपल्याला कोरोना आहे की नाही हे तपासू शकता.
काय आहेत खास फीचर्स
आरोग्य सेतु अँपमध्ये दोन खास फीचर्स आहेत. यात राज्यवार कोविड-19 हेल्पलाईन नंबर्सची लिस्ट दिली गेलीय.तसेच दुसरं म्हणजे सेल्फ असेसमेंट. या फिचरद्वारे आपण स्वतःची चाचणी करू शकतो. यातून तुम्हाला कोरोना धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते.जर तुमच्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणं असतील तर हे अप तुम्हाला सेल्फ आयसोलेशनसाठी निर्देश देतं. महापालिकांना क्वॉरन्टाईन रुग्णांची माहिती घरबसल्या मिळणार, दोन मराठमोळ्या तरुणांनी बनवले अँप अँप डाऊनलोड करताना काळजी घ्या
गुगल प्ले स्टोरवर ‘AarogyaSetu’ असं टाईप करा. हे अॅप  NIC (नॅशनल इन्फर्मेटिक सेंटर) ने बनवलं आहे. प्ले स्टोरवर याच प्रकारचे काही बोगस अॅप देखील आहेत. त्यामुळं NIC ने पब्लिश केलेलं अँपच घ्या
Source: Internet 

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget