ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावे. मा.श्री.रोहित पवार

देशात वाढत जाणाऱ्या ‘कोरोना’बाधितांचा आकडा लक्षात घेता याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशात पुढच्या २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जारी केला आहे. जीवनावश्यक सेवा-सुविधा वगळता संपूर्ण देश पूर्णपणे लॉकडाऊन असणार आहे. मात्र, तरीही अनेक जण घराबाहेर पडत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व खाजगी वाहनांना पेट्रोल-डिझेल विक्री करण्यावर सरकारने बंदी आणली आहे. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु करण्याची मागणी केली आहे. “शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता सरकारने ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावे”, अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

“शेतकऱ्यांना भर उन्हात, रात्री-अपरात्री पिकाला पाणी द्यायला जावे लागते. भाजीपाला, धान्य, चाऱ्याची वाहतूक, तसेच नांगर व ट्रॅक्टरवरील मळणी यासाठीही डिझेल लागते. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेता सरकारने ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावे”, अशी विनंती रोहित पवारांनी केली आहे. खाजगी वाहनांना सरकारने पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याने रोहीत पवार यांनी या निर्णयासंदर्भात पुर्नविचार करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. दरम्यान, कृषीविषयक वाहतुकीत कोणताही अडथळा येणार नाही. कृषीविषयक वाहतूक ही राज्यात सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यापूर्वीही स्पष्ट केले आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget