आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक यांनी सोशल डिस्टंसिंगची ताकद दाखवणारा व्हिडीओ केला शेअर बघा काय आहे तो व्हिडीओ.....

करोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी अद्याप कुठलेली ठोस औषध उपलब्ध नसल्याने सोशल डिस्टंसिंग हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) यावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची ताकद काय आहे? हे सांगण्याचा प्रयत्न  मा. श्री.प्रशांतराव परिचारक (आमदार विधान परिषद ) यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे.  त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मंगळवारी देशवासियांशी संवाद साधताना करोनापासून वाचण्यासाठी सध्या सोशल डिस्टंसिंग हाच एकमेव उपाय असल्याचे सांगितले होते.

या व्हिडिओत म्हटलं आहे की, एक करोनाबाधित व्यक्ती पाच दिवसांमध्ये २.५ लोकांना बाधित करु शकते. याप्रमाणे ती तीस दिवसांत ती ४०६ लोकांना बाधित करु शकते. जर या बाधित व्यक्तीने सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी करुन लोकांशी ५० टक्क्यांनी संपर्क कमी केला तर पाच दिवसांत ती १.२५ लोकांना बाधित करु शकते. त्यामुळे ३० दिवसांत केवळ १५ लोकांना ती बाधित करु शकते. तसेच जर या व्यक्तीने सोशल डिस्टंसिंगची अधिक कडक अंमलबजावणी केली आणि लोकांशी ७५ टक्क्यांनी संपर्क कमी केला तर ती व्यक्ती ५ दिवसांत ०.६२५ लोकाना बाधित करु शकते. त्यामुळे ३० दिवसांत केवळ २.५ लोकांनाच या व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे बाधा होऊ शकते.
अशा प्रकारे सोशल डिस्टंसिंगची जितकी कडक अंमलबजावणी तुम्ही कराल तितका करोना विषाणूचा संसर्ग समाजात कमी प्रमाणात होईल हे या आकडेवारीतून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget