पंढरपूरातील मुद्रण व्यावसायिकावर कोरोनाचे संकट - पंढरपूर युवा मुद्रक संस्था अध्यक्ष, दत्ता पाटील
पंढरपूर : पंढरपूरात गेल्या 50 दिवसापासून कोरोना संसर्ग जन्य रोगामुळे संपुर्ण शहरात लॉकडाऊन आहे. सगळीकडे कोरोनाच्या भितीने व्यवसाय बंद आहेत. पंढरपूरात सर्व प्रकारचे प्रिटींग करणारे जवळपास 35 मुद्रक आहेत. पण गेल्या 50 दिवसापासून प्रिटींग प्रेस बंद असल्यामुळे मुद्रकांची अवस्था खुप वाईट झाली आहे. प्रेसचा मालक असल्यामुळे कुणाला तोंड उघडून बोलताही येत नाही. व कुणाला मदतही मागता येत नाही,आपली व्यथाही सांगु शकत नाही. व कुणी मदत पण करत नाही. मदतीपेक्षा आमचा व्यवसाय चालू व्हावा ही मुद्रकांची अपेक्षा आहे. पण खरी परिस्थिती फारच भयावह आहे. या 35 प्रेसपैकी जवळपास 30 एक प्रेस असे आहेत की जे गड्याचे मालक झाले आहेत. त्यामुळे प्रिटींग प्रेस मध्ये मालक , ऑपरेटर,बांईडर व किरकोळ काम हेल्पर या सर्वाची भुमिका एक मालकच निभावित आहे.
प्रिटींग प्रेसमध्ये अनेक बदल होत गेले. कॉम्प्युटर आल्यामुळे 50 % कामे कॉम्प्युटर होऊ लागली. मोठ्या शहरातून डिजीटल प्रिटींगच्या माध्यमातून स्वस्त छपाई करून मिळू लागली. स्पर्धेचे युग असल्यामुळे अनेकांचा ओढा मोंठ्या शहराकडे वाढला व गावातील मुद्रक हताश होऊन बसला. काय करावे हे त्याला समजेनासे झाले. अशाही परिस्थितीत मुद्रक आपले आस्तित्व टिकवून आहे.आपआपल्या गावातील नागरिकांना त्यांची किरकोळ कामे, अर्जंट कामे करून देत आहे. प्रशासनाची कामे वेळेत देत आहे.
प्रिटींग व्यवसायात दोन पैसे मिळवून देणारा व वार्षिक नियोजन करता येणारासारखा सिझन म्हणजे लग्नसराई असते.यात मागील देणी देणे व नवीन व्यवस्था करणे ही असते. ती पण आता हातातून गेली. आता जवळपास एक वर्ष तरी लग्नसराई होणार नाही हे निश्चित आहे. त्याचबरोबर अनेक संस्था,बँका, व्यापारी यांच्यावरही बंदचा परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांचीही कामे 50% कमी झालेली आहेत. मग मुद्रकांनी जगायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. मदतही मागता येत नाही व काम ही नाही त्यामुळे मुद्रकांवर अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती प्रत्येक शहरात गावात आहे. प्रिटींग प्रेसचा मालक असल्यामुळे कुणी मदत करायला तयार नाही. व सरकारही काही मदत करत नाही अशी परिस्थिती मुद्रकावर आली आहे. मशिनचे चाक फिरले तरच रोजी रोटी भागणार आहे अन्यथा मुद्रकांची अवस्था फारच वाईट आहे. रोजचा दिवस सारखाच आहे, लॉकडाऊन आज संपेल, उद्या संपेल असे म्हणून आज जवळजवळ 50 दिवस झाले. यातूनही काहीतरी मार्ग निघेल या आशेवर मुद्रक होता पण तसे काही दिसून येत नाही. अजुनही लॉगडाऊन वाढेल अशी शक्यता आहे. त्यामुळे मुद्रक अगोदरच कर्जबाजारी आहे. आता त्याला सावरकाराकडून कर्ज काढण्याशिवाय पर्याय नाही असे दिसू लागले आहे.आणि एकदा तो या चक्रव्युहात अडकला की मग त्यातून तो बाहेर निघेल यांची खात्री नाही.
वरील सर्व गोष्टीचा विचार केला तर मा.मुख्यमंत्री व सरकारने व स्थानिक प्रांताधिकारी, मुख्याधिकारी व पोलीस प्रशाशनाने लवकरात लवकर लॉकडाऊन संपवावा किंवा रोज चार तास दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, रोज जर चार तास दुकाने उघडली तर गर्दी होणारच नाही, व तसेही आता गेल्या 50 दिवसात नागरिकांना कसे राहायचे हे अगदी चांगलेच कळले आहे. नागरीक स्वत:ची व दुसर्यांची काळजी घेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यावर लवकरच तोडगा काढावा. तरच मुद्रक जगेल अन्यथा मुद्रकांची अवस्था “ बाप भिक मागु देईना, व आई जेऊ घालीना ” अशी होईल तरी या लॉकडाऊनवर लवकरच तोडगा निघावा अशी सर्व मुद्रकांची अपेक्षा आहे.
Post a Comment