महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या.दिल्लीतली पुनरावृत्ती महाराष्ट्रत नको-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई : दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ   झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल, पण कोरोनाचे संकट जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले.बाजारांमध्ये गर्दी दिसता कामा नये विलगीकरणाचे पालन झालेच पाहिजे. कोणत्याही  परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारात आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास दुकाने उघडी ठेवली आहेत. मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असे दिसते. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या.
       आज साधारणपणे 1 महिना झाला आहे. ज्याप्रमाणे आरोग्य यंत्रणा, पोलीस राबत आहेत. त्याप्रमाणे राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि सर्व महसूल यंत्रणा 24 तास काम करते आहे, त्यासाठी त्यांना धन्यवाद दिले पाहिजे.
        परराज्यातील कामगार, श्रमिकांची संपूर्ण काळजी घ्या. कोणही राज्यात उपाशी राहणार नाही याची काळजी सरकार घेत आहे. सध्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे.आपण पुढील काळात आशा, अंगणवाडी सेविकाची यांची मदत घेऊ

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget