कोरोना व्हायरस संक्रमण दिवसेंदिवस वेगानं वाढत, महाराष्ट्रात 33 नव्या केसेस रूग्न संख्या 335

मुंबई : देशभरात कोरोना व्हायरस संक्रमण दिवसेंदिवस वेगानं वाढत आहे. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळत आहे. त्यापाठोपाठ केरळ, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. तीन राज्यांमध्ये 24 तासांत मोठ्या प्रमाणात नवीन केसेस समोर आल्या आहेत. दिल्लीत 53 नवीन जण पॉझिटिव्ह आढळल्यानं इथली संख्या 152 तर महाराष्ट्रात 33 नव्या केसेस आढळल्यानं 335 वर संख्या पोहोचली आहे.  अशी माहिती अरोग्य मंत्री राजेश टोपी यांनी ट्विटर वर ट्विट करत दिली. त्यापैकी एकट्या मुंबईतूनच 30 नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. मुंबईत तब्बल 5000 जण क्वारंटाइनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. त्यातच आता सर्वाधिक कोरोना पसरले अशी भीती असलेल्या धारावीत कोरोनाग्रस्त आढळून आल्याने लोकांमध्ये भीती आहे. 24 तासांत मुंबईत कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

ह्या वाढत्या प्रादूर्भावाला निजामुद्दीन तबलीगी जमातीची दिल्लीत झालेली परिषदही काही अंशी जबाबदार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. बुधवारी संध्याकाळी 437 नवीन नवे कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 1900 झाली असून आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget