२० एप्रिल नंंतर राज्यातील काही भागात खबरदारी घेऊन औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू करणार - उद्धव ठाकरे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. आता राज्य सरकारने २० एप्रिल नंंतर राज्यातील काही भागात खबरदारी घेऊन औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबतची माहिती राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचलनालयाकडून ट्वीटरवर देण्यात आलं आहे.

काय म्हटलंय राज्य सरकारने –

राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, अटी व शर्तींच्या अधीन राहून २० एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


#coronavirus चा मुकाबला करणे हे #Lockdown चे मूळ उद्दिष्ट. ते अबाधित राखून कंटेंनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतर ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


केंद्राने निर्देश दिल्याप्रमाणे ३ मे पर्यंत #Lockdown . त्याचे अतिशय काटेकोर पालन केले जाणार. सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छतेचे नियम पाळण्यासह नियमित मास्क घालणे आणि इतर कोणत्याही बाबी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

कुठल्याही कारणांसाठी गर्दी चालणार नाही. धार्मिक उत्सव, प्रार्थना स्थळांवरील गर्दी, मेळावे, खेळाच्या स्पर्धा, परिषदा, सभा यांच्या आयोजनाला परवानगी नाही. लोकांना अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विनाअडथळा मिळत राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget